शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:29 IST

WhatsApp : फेब्रुवारी महिन्यातच भारतात ७६ लाखांहून अधिक अकाऊंट बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत, तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद केलं जाऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया...

जगभरातील कोट्यवधी लोक प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वापरत आहेत. पण दरमहा लाखो अकाऊंट देखील बॅन केली जात आहेत. अकाऊंट बॅन करण्यामागे अनेक कारणं आहेत. मेसेजिंग App नुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच भारतात ७६ लाखांहून अधिक अकाऊंट बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत, तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद केलं जाऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया...

बरेच युजर्स अधिकृत WhatsApp वापरण्याऐवजी थर्ड-पार्टी अ‍ॅप्स वापरतात. अशा परिस्थितीत, WhatsApp Delta, GBWhatsApp आणि WhatsApp Plus सारख्या नावांनी अनेक App उपलब्ध आहेत. पण कंपनी या अ‍ॅप्सच्या वापरावर बंदी घालते. जर तुम्ही हे थर्ड-पार्टी App वापरत असाल तर तुमचे अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं.

दुसऱ्याची ओळख वापरणं

जर तुम्ही दुसऱ्याचं नाव, प्रोफाइल फोटो आणि ओळखपत्र वापरून मेसेज करत असाल तर तुमचं WhatsApp अकाऊंट देखील बॅन केलं जाऊ शकतं. असं करणं देखील WhatsApp च्या कम्युनिटी गाईडलाइन्सचं उल्लंघन मानलं जातं. तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटी, ब्रँड किंवा संस्थेची ओळख वापरल्यास तुमचं अकाऊंट ब्लॉक केलं जाऊ शकतं.

कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर मेसेज पाठवणे

जर तुम्ही दिवसभर अशा लोकांना मेसेज करत असाल जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाहीत, तर तुमचे मेसेज स्पॅम मानला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचे अकाऊंट बंद केलं जाईल.

रिपोर्ट केल्यावर बंद होईल अकाऊंट

जर अनेक युजर्सनी तुमचं अकाऊंट रिपोर्ट केलं असेल तर कंपनी तुमच्यावर कारवाई करू शकते. कंपनी तुमचं अकाऊंट बंद करू शकते. रिपोर्ट करणारी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा भाग आहे की नाही याने फरक पडणार नाही.

इतरांना त्रास दिल्यास कारवाई 

जर तुम्ही एखाद्याला त्रास देण्याच्या किंवा धमकी देण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवले तर तुमचं अकाऊंट बंद केलं जाईल. याशिवाय, प्रक्षोभक, द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याबद्दल तुमच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान