बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण  

By सिद्धेश जाधव | Published: October 19, 2021 06:39 PM2021-10-19T18:39:26+5:302021-10-19T18:40:15+5:30

Apple India Polishing Cloth Price: Apple ने नवीन Macbook सोबत एक ‘Polishing Cloth’ (कापड) सादर केलं आहे. विशेष म्हणजे या कपड्याने फक्त काही खास प्रोडक्ट साफ करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.  

apple launches rs 1900 polishing cloth in india | बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण  

बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण  

googlenewsNext

अ‍ॅप्पलने सोमवारी Unleashed इव्हेंटमधून नवीन MacBooks, Airpods आणि HomePad mini सह एक नवीन ‘Polishing Cloth’ (पॉलिशिंग क्लॉद) सादर केला आहे. या कापडाची घोषणा झाली याचे नवल वाटले नाही, परंतु याची किंमत ऐकून नेटीजन्सनी कंपनीला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने भारतात या कापडाची किंमत 1,900 रुपये ठेवली आहे.  

हे कापड अ‍ॅप्पलचे सर्व प्रोडक्ट आणि त्यांची स्क्रीन साफ करण्यासाठी खास डिजाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यात खास नॅनो टेक्चर्ड Apple Pro Display XDR चा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे 200 रुपयांच्या आत देखील दर्जेदार मायक्रोफायबर क्लिनिंग क्लॉद ऑनलाईन विकत घेता येत आहेत. त्यामुळे अ‍ॅप्पलच्या या कापडाच्या किंमतीविषयी राग व्यक्त केला जात आहे.  

या सफेद रंगाच्या कापडाची डिजाईन खूप सोप्पी आहे आणि यावर Apple चा लोगो आहे. कंपनीने यात सॉफ्ट नॉनअब्रेसिव्ह मटेरियलचा वापर केला आहे. या कपड्याने कंपनीच्या सर्व प्रोडक्टची स्क्रीन साफ करता येईल.  

विशेष म्हणजे या कपड्याचा वापर कोणत्या प्रोडक्टवर करणे योग्य ठरेल याची यादी देखील कंपनीने दिली आहे. या यादीनुसार जवळपास सर्वच अ‍ॅप्पल प्रोडक्ट कम्पॅटिबल आहेत. यात iPhone 6 आणि त्यानंतरचे आयफोन्स, 2015 पासूनचे MacBooks आणि iMacs, सर्व iPads, Apple Watch आणि iPod touch आणि वर सांगितल्याप्रमाणे Pro Display XDR चा समावेश आहे. जुन्या आयफोन्सचा यात समावेश नाही म्हणजे या कपड्याने ते फोन्स साफ करता येणार नाहीत?   

Web Title: apple launches rs 1900 polishing cloth in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.