शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

चंद्रकांत पाटील यांच्या धमकीला आपण घाबरत नाही : संजय शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:02 IST

सोनके (ता. पंढरपूर) येथे आ. दीपक साळुंखे यांच्या फार्महाऊसवर माढा मतदार संघातील राष्टÑवादी व काँग्रेस आमदारांसह पदाधिकाºयांची बैठक झाली.

ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदार संघातील माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, फलटण, सांगोला, माण, खटाव आदी तालुक्यातील राष्टÑवादी व काँग्रेसच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठकमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दमबाजीला मी घाबरत नसल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.

पंढरपूर : मी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता, यामुळे गद्दारीचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्यामुळे ग्रामीण भागात भाजपचे अस्तित्व निर्माण झाले आहे़ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दमबाजीला मी घाबरत नाही, असे लोकसभा माढा मतदार संघातील राष्टÑवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगितले.

सोनके (ता. पंढरपूर) येथे आ. दीपक साळुंखे यांच्या फार्महाऊसवर माढा मतदार संघातील राष्टÑवादी व काँग्रेस आमदारांसह पदाधिकाºयांची बैठक झाली. बैठकीनंतर संजय शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संजय शिंदे म्हणाले, माझ्याविरुद्ध कोणताही, कुठलाही उमेदवार असू द्या, माझी तयारी झाली आहे. मी कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये, स्कॅन्डलमध्ये, संस्थेच्या लफड्यामध्ये अडकलो नाही. यामुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दमबाजीला मी घाबरत नसल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.

माढा मतदार संघातील नेत्यांची बैठक- माढा लोकसभा मतदार संघातील माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, फलटण, सांगोला, माण, खटाव आदी तालुक्यातील राष्टÑवादी व काँग्रेसच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक सोनके (ता. पंढरपूर) येथे झाली आहे. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे, आ. दीपक चव्हाण, रश्मी बागल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रामराजे निंबाळकर, माजी आ. दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, जयमाला गायकवाड, युवराज पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माढा मतदार संघात स्टार प्रचारकाच्या सभा घेणे, कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने कामे करून घ्यायचे याबाबत चर्चा झाली़ तसेच ३ एप्रिल रोजी सकाळी ११़३० वाजता लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखBharat Bhakkeभारत भालके