शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबशेतीनं फुलवला घोरपडे दांपत्याचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:08 IST

कव्हेतील शेतकºयाचा यशस्वी प्रयोग; सेंद्रिय खतावर अन् अंतर्गत मशागतीवर ३० गुंठ्यात घेतले फूल पीक

ठळक मुद्देभविष्यात कव्हेत फ्लॉवर हब बनवण्याची धडपड कृ षी विभागाच्या माध्यमातून सुरू३० शेतकरी हे एकत्रित येऊन सामूहिक गुलाब शेती करण्याचा प्रयोग सुरू गलांडा फुलासाठी कोरफळेतून ३० शेतकºयांनी सामूहिक शेतीसाठी तयारी चालवली

प्रसाद पाटील 

पानगाव : गुलाबाचं फूल म्हणजे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं... पण या गुलाब शेतीनं मात्र एकाचा प्रपंच फुलवलाय... रोजच्या काही हजारात येणाºया आर्थिक उत्पन्नामुळे कव्हे (ता. बार्शी) येथील त्या कुटुंबाने आर्थिक प्रगती साधली आहे. सेंद्रिय खते आणि किरकोळ फवारण्या करून त्यांनी हे पीक साधले आहे.

शेतकरी सुभाष अर्जुन घोरपडे असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ त्यांची एकूण अडीच एकर जमीन आहे. बागायतीत त्यांनी भावासोबत एक मोठे शेततळे साकारून पाण्याचे व्यवस्थापन केले. या अडीच एकरापैकी ३० गुंठे (पाऊण एकर) क्षेत्रावर ते गेल्या २० वर्षांपासून    गुलाब शेती करताहेत़ खरीप    हंगामात ३० गुंठे क्षेत्रावर शेवंतीच्या फुलांची लागवड केली आहे. पाऊण एकर गुलाबापासून दररोज सरासरी एक हजार रुपये तर शेवंती   फुलापासून आॅक्टोबर ते मार्च या    पाच महिन्यात सरासरी दोन हजार रुपये मिळताहेत़ गुलाबाच्या १० फुलांच्या एका पेंढीला १० ते २५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दररोज २०० पेंढ्यांची बाजारात विक्री होते़ यापासून या कुटुंबाला सकाळी दोन तासांच्या श्रमात वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते आहे़ घरातील व्यक्ती आणि मजुरांकरवी दररोज एक क्विंटल फुले बाजारात जातात. शेवंतीला दर ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळाला आहे. शेवंतीपासून घोरपडे यांना पाच महिन्यांत ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ फुलावर फवारणीसाठी त्यांना वार्षिक ४० हजार रुपये तर शेवंतीच्या रोग व कीड नियंत्रणासाठी ६० हजार खर्च झाला आहे. या कुटुंबाला वार्षिक निव्वळ नफा ५ लाख रुपये झाला आहे.

गुलाबावर ढगाळ वातावरणात भुरी, करपा, मावा यांचा प्रादुर्भाव   होतो़ अशावेळी तो रोखण्यासाठी २२:३ आणि रोगर यांच्या फवारण्या केल्या आहेत. १५ मिनिटात ३० गुंठ्यांवर फवारणी झाली़ शेवंतीवर बोंडअळी जडते़ त्यावर बायोरीनची फवारणी केली़ ही फवारणी एकदाच केली जाते़ लागवड केलेली गुलाबाची बाग  ही १० ते १५ वर्षे चालते़ कृषी  सहायक सुधीर काशीद यांचे मार्गदर्शन लाभत आहे़ 

कव्हेत फ्लॉवर हब बनवण्याची धडपड - भविष्यात कव्हेत फ्लॉवर हब बनवण्याची धडपड कृ षी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे़ येथील ३० शेतकरी हे एकत्रित येऊन सामूहिक गुलाब शेती करण्याचा प्रयोग सुरू आहे़ कृ षी सहायक हे येथेच आढावा घेतात़ तसेच शेवंतीसाठीही जवळचे ३० शेतकºयांची सामूहिक शेती करत आहेत़ याशिवाय गलांडा फुलासाठी कोरफळेतून ३० शेतकºयांनी सामूहिक शेतीसाठी तयारी चालवली आहे़

६ बाय ६ वर गुलाब रोपे लावली़ तण उगवल्यानंतर कोळप्याने अंतर्गत मशागत केली़ पावसाळ्यात ३-४ वेळा मशागत केली़ सेंद्रिय खतावर ही संपूर्ण बाग फुलवली आहे़ या कामात पत्नी प्रभावती व मुलगा संकेत यांची साथ लाभली आहे. - सुभाष घोरपडे फूल उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी