शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 2, 2025 16:58 IST

अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला.

-बाळकृष्ण दोड्डी, सराटी तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणाऱ्या एका वीसवर्षीय युवकाने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागही घेतला. रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वासमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला. विशेष म्हणजे, त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याची आजी एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले.

कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का... माझ्या लेकीला काय उत्तर देऊ.. असे हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते. सहा वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेना. त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनारी बसून राहिली. प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांच्या दिंडी क्रमांक १२ मधील वारकरी संतापले. रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. अर्धा तासाहून अधिक वेळ त्यांनी रास्ता रोखून धरला.

घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. मृतदेह शोधून काढण्याचा शब्द दिल्यानंतर वारकरी रस्त्यावरून उठले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. दिंडी क्रमांक १२ मधील काही वारकरी त्या रडणाऱ्या आजीसोबत थांबले.

एकुलता एक मुलगा

ही दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकर कराबे यांच्या बाबतीत घडली आहे. नदीत वाहून जाणाऱ्या युवकाचे नाव गोविंद कल्याण फोके (वय २०, रा. झिरपी) असे आहे. 

गोविंद हा फरागबाई कराबे यांच्या लेकीचा मुलगा असून तो यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला. गोविंद हा नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा असून, फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. १८ जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक १२ (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) मध्ये तो सहभाग झालेला होता.

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा