शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी नगराध्यक्ष कोण?

By admin | Updated: July 4, 2014 01:35 IST

बार्शीकडे लक्ष: अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या जास्त

बार्शी : राज्यातील मुदत संपलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने स्थगित केल्याने या निवडी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ‘अ’ दर्जाची नगरपालिका असलेल्या बार्शीचा नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ २००९ मध्ये झालेल्या बार्शी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (दिलीप सोपल), काँग्रेस (राजेंद्र राऊत-बारबोले) व शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती़ यामध्ये विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवले होते़ त्यांचे २३ तर विरोधी काँग्रेसचे १५ नगरसेवक विजयी झाले होते़ शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नव्हती़ बार्शी नगरपरिषदेवर २००४ पासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे़ सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष पद हे ओबीसीसाठी आरक्षित असल्याने नगरसेवक कादर तांबोळी यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची तर पाहिल्यांदाच विजयी झालेल्या राहुल कोंढारे यांच्यावर उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती़ २० जून रोजी अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने नवीन निवडी होणार होत्या,मात्र शासनाने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करीत सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती़ मात्र हा निर्णय मागे घेतल्याने येत्या आठ ते दहा दिवसांत या निवडी होणार आहेत़ पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुले झालेल्या असल्यामुळे इच्छुकांची संख्या ही जास्त झाली आहे़ --------------------------सोपल यांच्याकडे लक्षखुल्या गटातून नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका मंगल शेळवणे, रमेश पाटील, गणेश जाधव, बाबुराव जाधव, दगडू मांगडे तसेच सुभाष लोढा यांच्या नावांची चर्चा आहे़ त्यामुळे या सहा जणांतून पालकमंत्री दिलीप सोपल हे कोणाचे नाव फिक्स करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ यातील कोणताच नगरसेवक उघडपणे इच्छुक असल्याचे दाखवत नाही, मात्र खाजगीत ते प्रखर इच्छुक असल्याचे दिसत आहे़ --------------------------बार्शीकरांच्या नजरानगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांमधूनच एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे़ किंवा नगराध्यक्षपद हे सव्वा वर्ष वाटून दिले जाऊ शकते. एकंदरीत येत्या पंधरा दिवसांत होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे बार्शीकरांच्या नजरा लागल्या आहेत़