पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:08 IST2025-10-08T18:05:21+5:302025-10-08T18:08:51+5:30
Pandharpur Crime news: पुण्यातून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक गेले होते. त्यांना मंदिराच्या परिसरातच बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्यांची ओळख पटवली असून, गुन्हा दाखल केला.

पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
Pandharpur Crime News : विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुण्याहून पंढरपुरात आलेल्या चार भाविकांना मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. आरोपींनी भाविकांना मारहाण करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, प्रदीप महादेव पाटील (वय ६९, रा. ससाणे कॉलनी केशवनगर, मुंडवा, पुणे) व त्यांचे मित्र दिलीप वर्णे, नंदकिशोर मोरे, राऊतआप्पा चलवादी व इतर २९ असे ३३ लोक सर्व (रा. पुणे) हे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पश्चिमद्वार येथे फोटो काढत होते.
मारहाण करण्याआधी काय घडलं?
एक अनोळखी इसम दुचाकी गाडीवरून येऊन शिवीगाळ करून तेथून निघून गेला. त्यानंतर पश्चिमद्वार येथून पुढे चौफाळ्याकडे येत पश्चिमद्वार येथून पुढे चौफाळ्याकडे येत असताना गंजेवार बोळात गंजेवार भांड्याच्या दुकानासमोर आले असता तेथे लगेच परत त्याच्यासोबत अजून दोन अनोळखी इसमांना सोबत घेऊन आला.
तेव्हा दिलीप वर्णे यांनी त्या अनोळखी इसमास तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली? असे विचारले. त्यानंतर त्यातील स्वप्निल अहिरे नावाच्या इसमाने तेथील सिमेंटचा ब्लॉक हातात घेऊन त्यांच्या डोक्यात मारला. यात ते गंभीर जखमी झाले.
पंढरपुरात अज्ञात तरुणांकडून वारकरी भक्तांना मारहाण pic.twitter.com/SgywtPcjfb
— News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2025
त्यानंतर त्याने चलवादी यांच्याही पायावर जोरात मारले, त्यात ते जखमी झाले. तेव्हा प्रदीप पाटील व नंदकिशोर मोरे असे मधे गेले. त्यानंतर माऊली लोंढे याने तेथेच असलेल्या चहाच्या टपरीजवळील स्टीलची बकेट हातात घेऊन प्रदीप पाटील यांच्या पाठीत व मोरे यांच्या हातावर मारून जखमी केले.
पोलिसांनी यांच्याविरोधात दाखल केला गुन्हा
याप्रकरणी स्वप्निल अहिरे, माऊली लोंढे व निळा टी-शर्ट परिधान केलेला अनोळखी व्यक्ती, निळा टी-शर्ट परिधान केलेला अनोळखी व्यक्ती (सर्व रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.