मतदान भाजप-शिवसेनेला करता अन आरक्षण आम्हाला मागता; शरद पवार यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 15:08 IST2019-03-01T15:06:01+5:302019-03-01T15:08:01+5:30
करमाळा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याआधी कोणी ओळखत तरी होते का ? मुख्यमंत्र्यांना शेतीमधील काय कळतं, ...

मतदान भाजप-शिवसेनेला करता अन आरक्षण आम्हाला मागता; शरद पवार यांचा सवाल
करमाळा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याआधी कोणी ओळखत तरी होते का ? मुख्यमंत्र्यांना शेतीमधील काय कळतं, साधा भुईमुग नक्की कुठे उगवतो हे तर त्यांना माहित आहे का ? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, करमाळा तालुका, माढा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता, पदाधिकारी संवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार हुशार आहेत़ कोर्टात न टिकणारे आरक्षण त्यांनी मराठा समाजाला देऊन जल्लोष करा असं सांगतात ? मतदान भाजपा-शिवसेनेला करता आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्या असे आम्हाला सांगता हे काय बरोबर नाही असा मिश्किल सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
करमाळ्याच्या मेळाव्यात पवारांनी फडणवीसांवर टिका केली परंतु सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह अन्य अशी मातब्बर नेत्यांनी दांडी मारल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी उघड झाली आहे.