शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

औज बंधार्‍यात सहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By admin | Updated: June 6, 2014 01:12 IST

पाच टी.एम.सी. सोडण्याचा निर्णय : शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणार्‍या औज बंधार्‍यात उजनीवरून पाणी सोडण्यात न आल्याने सध्या पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. पाणी सोडण्याबाबत गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत ५ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. असे असले तरी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. सोलापूर शहराला उजनीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी भीमा नदीतून औज बंधार्‍यात हे पाणी सोडले जाते. रोटेशन पद्धतीने दि. १ जून रोजी हे पाणी उजनी धरणातून सोडणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने औज बंधार्‍याच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या मृतसाठा शिल्लक असून बंधार्‍यात चारी मारून पाण्याचा उपसा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज औज बंधार्‍यातून ५५ ते ६0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. तसेच उजनीहून थेट पाईपलाईनने ५५ ते ६0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. तर एकरुख (हिप्परगा) तलावातून १0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. वास्तविक पाहता शहराला दररोज १३५ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता असताना फक्त १00 ते ११0 एम.एल.डी. पाणी प्राप्त होते. त्यामध्ये औज बंधार्‍यातील पाण्यावर निम्म्यापेक्षा जास्त शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. असे असताना सध्या बंधार्‍यात पाणीच नसल्याने फक्त ५ ते ६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याबाबत दि. ३ जून रोजी पाटबंधारे मंत्र्यांसमवेत बैठक झाली होती; मात्र यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शहरासमोर पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत गुरुवारी आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने यांची जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली; मात्र निर्णय झाला नव्हता. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ५ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. हे पाणी पोहोचण्यास ८ दिवस लागणार असून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.------------------------------पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत, मात्र हे पाणी ६ ते ७ हजार क्युसेक्सने सोडल्यास ते औज बंधार्‍यात पोहोचण्यास आठ दिवस लागतील. - विजय राठोड सार्वजनिक आरोग्य अभियंता