भिलारवाडीत हिंस्र प्राण्याचा वासरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:03+5:302020-12-05T04:43:03+5:30

भिलारवाडी येथे १ डिसेंबरच्या रात्री शेतात बांधलेले जनावरे दावे तोडून पळून गेल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी ...

Violent animal attacks calf in Bhilarwadi | भिलारवाडीत हिंस्र प्राण्याचा वासरावर हल्ला

भिलारवाडीत हिंस्र प्राण्याचा वासरावर हल्ला

भिलारवाडी येथे १ डिसेंबरच्या रात्री शेतात बांधलेले जनावरे दावे तोडून पळून गेल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी त्या प्राण्याचे ठसे तसेच स्वतः त्या प्राण्याला पहिले असून तो बिबट्याच असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. या प्राण्याच्या हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या प्राण्याच्या पायाच्या ठशाचे फोटो व व्हिडीओ शूट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी याच भागातील येथील शेतकरी बाळू ज्ञानदेव माने यांच्या जनावरांच्या गोठ्यातील एक वासरू व एक जर्सी गायीवर हल्ला केला होता. रात्री शेतीला पाणी देणारे शेतकरी हा प्राणी बिबट्याच असल्याचे सांगत आहेत.

फोटो

०२ करमाळा०१

फोटो ओळी

भिलारवाडीत हिंस्र प्राण्याने वासरावर हल्ला करून ठार मारल्याचे दिसत आहे.

Web Title: Violent animal attacks calf in Bhilarwadi