साेलापूरचे युवक २० मार्च राेजी विधान भवनाला घेराव घालणार, काॅंग्रेसच्या बैठकीत निर्णय  

By राकेश कदम | Published: March 15, 2023 07:14 PM2023-03-15T19:14:48+5:302023-03-15T19:15:01+5:30

प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून २० मार्च मुंबईत विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे.

   Vidhan Bhavan will be surrounded on March 20 through the State Youth Congress  | साेलापूरचे युवक २० मार्च राेजी विधान भवनाला घेराव घालणार, काॅंग्रेसच्या बैठकीत निर्णय  

साेलापूरचे युवक २० मार्च राेजी विधान भवनाला घेराव घालणार, काॅंग्रेसच्या बैठकीत निर्णय  

googlenewsNext

साेलापूर : प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून २० मार्च मुंबईत विधानभवनाला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदाेलनात शहरातील शेकडाे युवकांना साेबत घेउन जाण्याचा निर्णय युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी घेतला. 

मुंबईतील आंदाेलनाच्या तयारीसाठी युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी सायंकाळी काॅंग्रेस भवनात बैठक झाली. अध्यक्षस्थानी साेलापूर प्रभारी आनंदकुमार दुबे हाेते.  युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, केंद्र सरकारचे बेरोजगारी आणि महागाई, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ, जुनी पेन्शन योजना याकडे दुर्लक्ष आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष आहे. या विराेधात मुुंबईत येथे युवकांचा मोर्चा निघणार आहे. या माेर्चात साेलापूर शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी हाेतील. 


या बैठकीला मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे,महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे,माजी परिवहन सदस्य तिरुपती परकिपंडला आदी उपस्थित होते.


 

Web Title:    Vidhan Bhavan will be surrounded on March 20 through the State Youth Congress 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.