टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार ; कुंभारीजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:10 AM2018-11-19T10:10:39+5:302018-11-19T10:12:23+5:30

कुंभारी रोडवरील घटना : ग्रामस्थांवर शोककळा

Two bikers killed in tempo; The incident near the Kumbhari | टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार ; कुंभारीजवळील घटना

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार ; कुंभारीजवळील घटना

googlenewsNext
ठळक मुद्दे वळसंग पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल संदीप वाले याच्या अपघाती निधनाने गावकºयांवर शोककळा पसरलीसंदीपला मुलगी बघण्याचे काम सुरू होते

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून कुंभारी गावाकडे जात असताना समोरून येणाºया आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दोघे ठार झाले. हा अपघात दुपारी ३.३0 वाजता घडला. 

संदीप ईरण्णा वाले (वय २४, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), सर्फराज इक्बालपाशा पटेल (वय ४५, रा. सिद्धेश्वर साखर कारखाना कॉलनी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. संदीप वाले याचे वडील हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात कामाला आहेत. कारखान्याकडून संदीप वाले हा मोटरसायकल (क्र.एम.एच.-३७३९) वरून सर्फराज पटेल यांना घेऊन कुंभारीकडे जात होता. तो कुंभारी रोडवरील गौरीशंकर ढाब्याच्या पुढे आला असता समोरून येणाºया आयशर टेम्पो (क्र.एम.एच.-१३ सीओ-४४0१) ने जोरात धडक दिली. धडकेत संदीप वाले हा गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाला.

पाठीमागे बसलेल्या सर्फराज पटेल यांना उपचारासाठी कुंभारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सर्फराज पटेल याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  तपास पोलीस हवालदार ढवळे करीत आहेत. 

लग्नाची तयारी...
- संदीप ईरण्णा वाले हा ड्रायव्हर असून तो मालट्रक चालवत होता, अत्यंत गरिबीतून आलेल्या या कुटुंबात संदीपचे वडील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात कामाला आहेत. मोठा भाऊ सोमशंकर हा देखील साखर कारखान्यातच कामाला आहे. दोन नंबर भाऊ सिद्धाराम हा बीएसएफमध्ये जवान आहे. मोठ्या भावाचे लग्न झाले असून आता राहिलेल्या दोन मुलांची लग्ने करण्याची तयारी ईरण्णा वाले करीत होते. दोन नंबरच्या भावाला मुलगी ठरवण्यात आली असून संदीपला मुलगी बघण्याचे काम सुरू होते. अशा परिस्थितीत अचानक संदीप वाले याच्या अपघाती निधनाने गावकºयांवर शोककळा पसरली आहे. 
 

Web Title: Two bikers killed in tempo; The incident near the Kumbhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.