शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: June 25, 2014 01:51 IST

महिलेने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मंद्रुप: अतिक्रमणाच्या प्रश्नावरुन निंबर्गी ग्रामपंचायतीसमोर महिलेने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.उपसरपंच शिवानंद कादे यांच्या समयसूचकतेमुळे ती महिला वाचली. ही घटना सोमवारी दुपारी निंबर्गी ग्रामपंचायतीसमोर घडली. दिलशाद उर्फ चिंगूबाई बाळाभाई मुलाणी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.दिलशादबी या आपली वृद्ध आई म्हताबबी मुलाणी व भाऊ राजअहमद मुलाणी यांच्यासमवेत इंदिरानगर भागात राहतात. त्यांच्या नावे २ हेक्टर २० आर जमीन आहे. त्यापैकी १ हेक्टर ५२ आर जमीन भूमिहीन बेघरांसाठी संपादन केली होती. याशिवाय १७२ बेघरांना प्लॉट पाडून देण्याची नोंद तलाठी कार्यालयात आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून आपल्या गट नंबर १७० मध्ये अतिक्रमण केले आहे. त्यावेळी विरोध केला असता महिला पोलिसांकरवी मारहाण करण्यात आली. आम्ही लावलेले कुलूप तोडून अतिक्रमण केले. या ठिकाणी ५ गाळे, ४ दुकाने व ७० घरे बांधण्यात आली. या ठिकाणी अंतर्गत रस्ता करण्यासाठी बुधवारी सर्व्हे करण्यात आला. सोमवारी वाळू, खडी आणून रस्ता करणार असल्याची कुणकुण दिलशादबी व त्यांच्या परिवारास लागली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमची या कामासाठी हरकत आहे, असे त्या ओरडून सांगत होत्या. त्यांचे म्हणणे कोणीही ऐकले नाही. शेवटी रागाच्या भरात रॉकेल अंगावर ओतले. काडी पेटवणार इतक्यात उपसरपंच शिवानंद कादे यांनी त्यांना वाचविले.