शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तीन बसवर दगडफेक

By admin | Updated: June 3, 2014 01:06 IST

चौघे जखमी

पंढरपूर : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांचे बदनामीकारक फोटो टाकल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना पंढरपुरातही निषेध व्यक्त करण्यात आला. हे प्रकरण आटोपते घेतल्यानंतर शहरातील वातावरण निवळले. पण सोमवारी ग्रामीण भागात तीन बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये चार प्रवासी जखमी झाले आहेत. पंढरपूर शहरामध्ये सकाळी दुकाने उघडी ठेवा असे सांगण्यासाठी पोलिसांच्या गाडीमधून व्यापार्‍यांना आपली दुकाने उघडी ठेवून व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहन केले. पंढरपूर शहरामधून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, पो.नि. अशोक कोळी, स.पो.नि. अनिल कदम व सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी संचलन केले. हे संचलन इंदिरा गांधी चौक, भोसले चौक, अर्बन बॅँक, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, सावरकर पुतळा या मार्गाने करण्यात आले. त्याचबरोबर शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी दीपक वाडदेकर, किरण घाडगे, नामदेव भुईटे, सौदागर मोळक, संतोष कवडे, दिलीप देवकुळे यांनी पंढरपुरातील व्यापार्‍यांना दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे शहरात दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकलासपूर येथे एम. एच. १४/बी. पी. ३०७२ व के. ए. २८/एफ १७२९ या बसवर सकाळी साडेअकराच्या सुमारास दगडफेक केली. या दरम्यान एकलासपूर बसस्थानकावर प्रवासी बसमध्ये चढत व उतरत होते. यामुळे बसमधील सुरेश सदाशिव काकडे (रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा), बापूसाहेब खंडू इंगोले, बंडू हनुमंत फाटे (रा. मंगळवेढा) व स्वाती नेताजी शिंदे (रा. कचरेवाडी) यांना दगड लागून ते जखमी झाले. त्याचबरोबर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तुंगत येथे एम. एच. ४०/वाय ५०१६ या बसवर अज्ञात लोकांच्या टोळक्याने दगडफेक केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.