सीना नदीच्या बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळली; मुलीचा मृत्यू, पती जखमी, पत्नी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 10:44 AM2022-02-05T10:44:03+5:302022-02-05T10:44:35+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The two-wheeler fell into the water from the embankment of the river Sinai; Girl killed, husband injured, wife missing | सीना नदीच्या बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळली; मुलीचा मृत्यू, पती जखमी, पत्नी बेपत्ता

सीना नदीच्या बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळली; मुलीचा मृत्यू, पती जखमी, पत्नी बेपत्ता

Next

सोलापूर : दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कलकर्जाळ येथील सीना नदीच्या बंधाऱ्यावर दुचाकीवरून जात असताना दुचाकी पुलावरून खाली कोसळली. यात दुचाकीसह पती-पत्नी आणि एक वर्षाच्या मुलगी पाण्यात पडले. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी बेपत्ता आहे. पती पोहत पाण्यातून बाहेर आले, ते जखमी झाले आहेत.

सीना नदीला महापूर आल्यानंतर बंधाऱ्याच्या एक बाजूचा भराव वाहून गेला आहे, परंतु याकडे लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्याने आजची दुर्दैवी घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


तडवळ भागातील रस्ते खराब असल्याने या भागातील लोक याच धोकादायक बंधारा ओलांडुन दक्षिण मधील रस्त्याचा पर्याय निवडतात असेही लोकांनी सांगितले. 

Web Title: The two-wheeler fell into the water from the embankment of the river Sinai; Girl killed, husband injured, wife missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.