शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 02:44 PM2022-06-22T14:44:50+5:302022-06-22T14:44:53+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The murder of a young man who went to drive a car in a field; Incidents in Mangalvedha taluka | शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

googlenewsNext

मंगळवेढा : अज्ञात कारणामुळे एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा तालुक्यातील अकोला रोडवरील वरकुटे वस्ती परिसरात घडली 

मंगळवेढा तालुक्यातील अकोला येथे घरनिकी-अकोला रोडवरील वरकुटे वस्ती येथे ऊसाच्या शेतात सचिन सिद्धेश्वर वरकुटे (वय २३, रा.अकोला ता.मंगळवेढा) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन वरकुटे हा तरुण मुलगा सकाळी मोटार चालू करण्यासाठी गेला होता तो परत आला नाही. म्हणून त्याची आई बराच वेळ झाल्यामुळे सचिन कुठे गेला हे पाहण्यासाठी शेतात गेली होती. दरम्यान, शेतात सचिन मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे,  सौरभ शेटे, पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, श्रीमंत पवार, सुनील मोरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

Web Title: The murder of a young man who went to drive a car in a field; Incidents in Mangalvedha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.