सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे कत्तलीसाठी जनावरे घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये कोंबून भरलेली २१ जनावरे जागीच मरण पावली. यातील काही जनावरे जिवंत असून ती सैरावैरा धावत असल्याचे चित्र दिसून आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मोहोळहून एमएच ११ एएल ३१५९ या ट्रकमधून धाराशिव कडे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होते. मोहोळ तालुक्यातील वाळूज गावाजवळील घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगातील ट्रक पलटी झाली. या ट्रकमध्ये कत्तलीसाठी जाणारी १०० वासरे होती. त्यापैकी २० वासरे जागीच मृत झाली आहेत आणि १ गाय मृत्यू पावली आहे.
जिवंत राहिलेली वासरे सैरावैरा धावत असल्याचे चित्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीं जनावरांना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाल्याचे सांगण्यात आले.
Web Summary : A truck carrying cattle to a slaughterhouse in Dharashiv overturned near Mohol, killing 21 animals. Many calves were found running loose near Waluj village. Police are investigating, and the injured animals are receiving veterinary care. The driver fled the scene after the accident.
Web Summary : मोहोल के पास धाराशिव में कत्लखाने के लिए जानवरों को ले जा रहा एक ट्रक पलट गया, जिससे 21 जानवर मारे गए। वालुज गांव के पास कई बछड़े खुले घूमते पाए गए। पुलिस जांच कर रही है, और घायल जानवरों का इलाज चल रहा है। दुर्घटना के बाद चालक मौके से फरार हो गया।