पोटच्या गोळ्याला दहा हजारांत विक ले

By Admin | Updated: June 9, 2014 01:16 IST2014-06-09T01:16:27+5:302014-06-09T01:16:27+5:30

सोलापूर : सासूसोबत भांडण करुन एका महिलेने दीड महिन्याच्या बाळाला विकल्याचा प्रकार

Take ten thousandth of the stomach pills for sale | पोटच्या गोळ्याला दहा हजारांत विक ले

पोटच्या गोळ्याला दहा हजारांत विक ले


सोलापूर : सासूसोबत भांडण करुन एका महिलेने दीड महिन्याच्या बाळाला विकल्याचा प्रकार ३० मे रोजी घडला़ या प्रकरणी बंडू नरसिंग कांबळे (वय ३१, रा़ पोलीस मुख्यालय एम़टी़बाजूस झोपडपट्टी) यांनी स्वत:च्या पत्नीसह दोन महिलांविरुद्ध फिर्याद दिली आहे़
सुजाता बंडू कांबळे आणि मूल विकत घेणारी दुसरी महिला हसीना आदम फुलारी (वय २२, ताश्कंद चौक, शास्त्रीनगर) अशा दोन महिलांविरुद्ध जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ ३० मे रोजी सुजाता ही सासूबाईबरोबर भांडण करुन दीड महिन्याच्या बाळाला घेऊन घराबाहेर गेली़ पती बंडू बाहेर चौकशी केली असता पत्नीने हसीना फुलारी या महिलेला बाळ दहा हजारांत विकल्याचे उघडकीस आले़ तपास फौजदार डोके करीत आहेत़

Web Title: Take ten thousandth of the stomach pills for sale