पंढरपुरात महिलेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या;

By Admin | Updated: May 18, 2014 00:17 IST2014-05-18T00:17:43+5:302014-05-18T00:17:43+5:30

चौघांवर गुन्हा

Suicide in a woman's husband's house in Pandharpur; | पंढरपुरात महिलेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या;

पंढरपुरात महिलेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या;

 

पंढरपूर : सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने बुधवारी आत्महत्या केली. याप्रकरणी शनिवारी पंढरपुरातील चार जणांविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करकंब (ता. पंढरपूर) येथील काजल वरपे हिचे लग्न पंढरपुरातील प्रदीप शांताराम धोत्रे यांच्याशी झाले. एकाच महिन्यानंतर तिच्या नवर्‍याने तिला चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर व्यवसायासाठी २ लाख रुपये आणण्यास सांगत होता. प्रदीप याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे काजलने प्रत्यक्ष पाहिले होते, हे संबंध बाहेर कोणाला सांगितले तर जीवे मारीन असे म्हणत तसेच वारंवार उपाशी ठेवत असत. या सर्व कारणांना कंटाळून काजलने करकंबच्या घरात ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी काजलची आई सुरेखा बाळू वरपे यांनी प्रदीप शांताराम धोत्रे, शालन शांताराम धोत्रे, ऊर्मिला धोत्रे, दीक्षा नितीन धोत्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title: Suicide in a woman's husband's house in Pandharpur;