नो-एंंट्रीत थांबलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST2020-12-05T04:42:11+5:302020-12-05T04:42:11+5:30

ट्रकचालकाला लुटले सोलापूर : मार्केट यार्डसमोरील ‘नो एंट्री’मध्ये थांबलेल्या ट्रक चालकाला बेदम मारहाण करून लुटल्याप्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध जोडभावी पेठ ...

Stopped at no-entry | नो-एंंट्रीत थांबलेल्या

नो-एंंट्रीत थांबलेल्या

ट्रकचालकाला लुटले

सोलापूर : मार्केट यार्डसमोरील ‘नो एंट्री’मध्ये थांबलेल्या ट्रक चालकाला बेदम मारहाण करून लुटल्याप्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला.

शिवानंद भीमाशंकर डुणगे (वय २२, रा. निंबर्गी, तालुका दक्षिण सोलापूर) हा चालक मालट्रक (केए-२८/बी-४७१७) मध्ये चिंचोळी एमआयडीसी येथून सोयाबीन कर्नाटक येथे घेऊन जाण्यासाठी निघाला होता. मालट्रक घेऊन तो मार्केट यार्डसमोर नो एन्ट्रीच्या रांगेत थांबला होता. दरम्यान, अज्ञात चौघे तेथे आले, केबीन जवळ येऊन शिवानंद डुणगे यांना खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. खिशातील अडीच हजार रुपये व १० हजारांचा मोबाईल काढून घेतला व तेथून निघून गेले.या प्रकरणी शिवानंद डुणगे याने फिर्याद दिली असून तपास फौजदार बोराडे करीत आहेत.

Web Title: Stopped at no-entry