परप्रांतिय कामगारांनी केली पोलिसांवर दगडफेक; चार पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:24 AM2020-04-17T08:24:01+5:302020-04-17T14:10:21+5:30

सांगोला तालुक्यातील घटना; कंपनीच्या व्यवस्थापकासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल

Stone-throwing of policemen Four policemen injured | परप्रांतिय कामगारांनी केली पोलिसांवर दगडफेक; चार पोलीस जखमी

परप्रांतिय कामगारांनी केली पोलिसांवर दगडफेक; चार पोलीस जखमी

Next
ठळक मुद्दे- काम करूनही पगार मिळत नसल्याने कामगारांनी व्यक्त केला संताप- वाद सोडविण्यासाठी आलेल्या पोलीसांवर कामगारांकडून दगडफेक- सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू

सांगोला : राष्ट्रीय महामार्गावर काम करणाºया परप्रांतीय मजूर कामगारांनी पगार मिळत नसल्याच्या कारणावरून कंपनीच्या अधिकाºयांसह पोलिसांवर दगडफेक केली़ यात एका खासगी वाहनांसह शासकीय वाहनांची तोडफोड करून नुकसान केल़े़. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ हा धक्कादायक प्रकार जुनोनी (ता. सांगोला) गावानजिक घडला आहे़ सहाय्यक पोलीस फौजदार विलास कांबळे, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस नाईक राजू चौगुले सह अन्य एक असे जखमी चार पोलीस कर्मचाºयांची नावे आहेत.

सोलापूर - सांगली राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय मजूर कामगार मोठ्या संख्येने कामावर आहे़ दरम्यान, या मजुरांचा पगार होत नसल्याने मजूर कामगार व व्यवस्थापक बाचाबाची सुरु असताना पोलिसांना पाचारण करण्यात आले़ यावेळी पोलिस कामगारांना समजून सांगत असताना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अखेर पोलिस आल्याचे पाहून संतापलेल्या कामगारांनी ठेकेदाराच्या गाड्या आणि कार्यालयाची तोडफोड सुरू केली़ त्यांनी एवढ्यावरच न थांबता पोलिसांवरही दगडफेक सुरू केली़ मजूर कामगार मोठ्या संख्येने असल्याने व पोलिसांची संख्या तोकडी असल्याने त्यांनी पोलिसाच्या खाजगी कारसह शासकीय वाहनाची तोडफोड करून पलटी केले़ या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत़ या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती घेऊन व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. गुरूवारी रात्री उशिरा व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


 

Web Title: Stone-throwing of policemen Four policemen injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.