सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 06:17 IST2026-01-03T06:15:41+5:302026-01-03T06:17:00+5:30
डॉ. किरण देशमुख यांच्या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी बाळासाहेब सरवदे व शंकर शिंदे गटांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तिथे मृत बाळासाहेब याच्या चुलत भावाच्या पत्नीने भाजपकडून उमेदवारी मागितली होती.

सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
मनसे विद्यार्थीसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे (३५, रा. जोशी गल्ली) यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी सांगितले, आ. विजयकुमार देशमुख यांचा मुलगा डॉ. किरण देशमुख यांचा प्रभाग बिनविरोध करण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात येत होते.
डॉ. किरण देशमुख यांच्या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी बाळासाहेब सरवदे व शंकर शिंदे गटांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तिथे मृत बाळासाहेब याच्या चुलत भावाच्या पत्नीने भाजपकडून उमेदवारी मागितली होती.
यामुळे सरवदे गट आक्रमक झाला. उमेदवारी नाकारल्याच्या रागातून सरवदे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या तोडफोडीचे कारण विचारण्यासाठी गेल्यावर सरवदे यांना बेदम मारहाण करून जागीच संपविल्याची घटना घडली.
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर : भाजपमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोर किंवा इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे आणि त्याच नाराजीतून सोलापुरात हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे. या धक्कादायक घटनेमुळे सोलापूर शहर हादरले आहे.