धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 06:37 IST2026-01-03T06:35:27+5:302026-01-03T06:37:05+5:30

गेल्या तीन-चार महिन्यांपासून आई-वडील मुलाला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हाता-पायाला जखमा झाल्या आहेत. 

Shocking 12-year-old boy tied up with a chain by his parents in Nagpur | धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 

धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 

नागपूर : ज्या आई-वडिलांच्या कुशीत मुलाला सुरक्षिततेची भावना मिळायला हवी, त्याच कुशीतून क्रौर्याचे दर्शन घडावे, अशी हादरवून टाकणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मुलगा चुकीचे वागतो, या कारणावरून आई-वडिलांनी आपल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलाच्या हात-पायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याची बाब समोर आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून आई-वडील मुलाला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हाता-पायाला जखमा झाल्या आहेत. 

मुलगा चुकीचे वागतो म्हणून असली क्रूर शिक्षा  -
या मुलाचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. दिवसभर सोबत मोठे कुणीच नसल्याने मुलगा चुकीचे वागू लागला होता. त्यामुळे आई-वडील कामासाठी जाताना त्याला साखळी व कुलपाने बांधायचे व कामावरून आल्यानंतर त्याला मोकळे करायचे. 

या मुलाबाबत चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तत्काळ धाव घेतली. तेव्हा तेथे भयभीत अवस्थेत, थरथर कापणारा मुलगा आढळून आला. 
 

Web Title : चौंकाने वाला! नागपुर में माता-पिता ने 12 वर्षीय बेटे को जंजीर से बांधा

Web Summary : नागपुर में, माता-पिता ने अपने 12 वर्षीय बेटे को महीनों तक जंजीरों से बांधे रखा, यह कहते हुए कि उसका व्यवहार खराब था। बच्चे को चोटें आईं। चाइल्ड हेल्पलाइन ने हस्तक्षेप किया, लड़के को डरा हुआ पाया। माता-पिता दोनों मजदूर के रूप में काम करते थे और पर्यवेक्षण की कमी के कारण उन्होंने क्रूर कृत्य किया।

Web Title : Shocking! Nagpur Parents Chain 12-Year-Old Son as Punishment

Web Summary : In Nagpur, parents chained their 12-year-old son for months, citing his bad behavior. The child endured injuries. Child Helpline intervened, finding the boy terrified. Both parents worked as laborers and resorted to the cruel act due to lack of supervision.

टॅग्स :nagpurनागपूर