शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधित जोडप्यांचा सोलापुरात विवाह; संकल्प युथ फाउंडेशनचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:29 IST

या विवाहामुळे मेळाव्यास आलेल्यांनाही बाधितांनाही मिळाली प्रेरणा

ठळक मुद्देबाधित वधू-वरांचे विवाह होताना अडचणी येतातविवाह झालाच तरी साध्या पद्धतीने होतोकाही मोजकीच व्यक्ती या विवाहाला असतात

सोलापूर : आपल्या लग्नात वºहाडी असावेत, हळद लागावी, साखरपुडा व्हावा, जोडवी, मंगळसूत्र, कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून मिळावे अशी स्वप्नं प्रत्येक नववधूची असतात. एचआयव्हीसंसर्गित मुलीला देखील आपले लग्न अशाच पद्धतीने व्हावे असे वाटत होते. पण ही इच्छा पूर्ण होईल का अशा विचारात असताना संकल्प युथ फाउंडेशनने याला साथ देत मुलीची इच्छा पूर्ण केली.

बाधित वधू-वरांचे विवाह होताना अडचणी येतात. विवाह झालाच तरी साध्या पद्धतीने होतो. काही मोजकीच व्यक्ती या विवाहाला असतात. यामुळे म्हणावा तसा उत्साह दिसत नाही; मात्र आपणही इतरांसारखेच आहोत. मग माझा विवाह इतरांसारखाच व्हावा अशी अपेक्षा वधूने केली होती. त्याला साथ देत व्हॅलेंटाईन डे या प्रेमाच्या दिवशीच त्यांचा अत्यंत थाटामाटात विवाह लावून देण्यात आला.

लग्नाचा हॉल फुले आणि फुग्यांनी सजविण्यात आला होता. सुग्रास जेवण तयार करण्यात आले होते. साखरपुडा करण्यात आला. हळद लावण्यात आली. फोटोही काढण्यात आले. मुलाला सफारी कपडे, बूट घेण्यात आले होते. तर मुलीला हळदीची साडी, लग्नातील साडी, बिचवे, जोडवी, मंगळसूत्र, पंैजण आदी भेट देण्यात आले. लग्नानंतर वधू-वरांच्या पालकांच्या डोळ््यात आनंद पाहायला मिळाला. विवाह करणारे जोडपे हे एकमेकांना ओळखत होते. संकल्प युथ फाउंडेशनने त्यांना एकत्र आणत विवाहाची जबाबदारी स्वीकारली. व्हॅलेंटाईन डे दिवशी त्यांचा विवाह तर केलाच त्याच दिवशी बाधितांचा स्नेहमेळावाही घेण्यात आला. या विवाहामुळे मेळाव्यास आलेल्यांनाही प्रेरणा मिळाली. आपला विवाह हा थाटामाटात व्हावा अशी इच्छाही पूर्ण झाली. या विवाहाला दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी संमती दिली.

परराज्यातील वºहाडी- या लग्न सोहळ्यासह बाधितांच्या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.  आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील विवाहेच्छुक वधू-वरांनी उपस्थिती लावली. वºहाडींच्या उपस्थितीत आपला विवाह व्हावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी इच्छा मेळाव्यामध्ये लग्न झालेल्या मुलीची होती. तिच्या या लग्नाला देशाच्या विविध भागातून आलेल्या वºहाडींनी आशीर्वाद देत तिची इच्छा पूर्ण केली. या मेळाव्यात ४० विवाहेच्छुक वर तर १२ विवाहेच्छुक वधूंची उपस्थिती लावली.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नHIV-AIDSएड्स