Solapur Crime news: पत्नीला कलाकेंद्रावर नाचण्यासाठी पाठविल्याचा गैरसमज करून घेऊन सावत्र दीर, सावत्र सासू व सासरा यांनी कुऱ्हाडीने मानेवर वार करून सावत्र भावजयीचा खून केल्याची घटना करकंब येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सावत्र दिराला ताब्यात घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हेमा आकाश काळे (वय ३५) असे खून झालेल्या भावजयीचे नाव असून ४ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान करकंब येथे टेंभी रोडजवळ (ता. पंढरपूर) ही घटना घडली. आकाश बिंदुल काळे (ता. पंढरपूर) हा पत्नी हेमा, मुलगा प्रथमेश, आमेश, हिमेश, प्रेम, रॉकी व मुलगी आरिना एकत्र राहतात. आकाश हा साडू सुमित चाच्युल काळे (रा. भिगवण) यांच्याकडे मासे पकडण्याचे काम करतो.
भावजयीची हत्या, काय घडलं?
करकंब येथे आकाशच्या घराजवळ वडील बिंदूल काळे, सावत्र आई शालीक, सावत्र भाऊ मुकुंदराजा व पत्नी सोनी हे मुलांसह राहतात. मुकुंदराजा याची पत्नी मागील एक महिन्यापापासून जामखेड येथे कलाकेंद्रावर नाचण्याकरिता जात आहे. तिला मयत हेमा हिने शिकवून पाठविल्याचे समज करून घेतले. सावत्र दीर मुकुंदराजा व सावत्र सासू व सासरा हे सारेजण आकाश व त्याची पत्नी हेमावर चिडून होते.
आकाशने पत्नीला तू लक्ष देऊ नकोस, मी पाणी घेऊन येतो, म्हणाला. त्यानंतर ५ वाजण्याच्या सुमारास आकाश हा पाणी घेऊन येत असताना बिंदूल, शालिका व मुकुंदराजा हे मारायला येत असल्याचे दिसले.
कुऱ्हाडीने मानेवर केला वार
त्यावेळी आकाशचा मुलगा प्रथमेश भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी मुकुंदराजा हातात कुन्हाड घेऊन हेमावर धावला. तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली, तुला मारून टाकतो म्हणत तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले, तर बिंदूल व शालिका काळे यांनी हेमाला धरले.
या घटनेनंतर आकाशने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हेमाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले; परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुख्य आरोपी मुकुंदराजा काळे याला पोलिसांनी अटक केली आहे.