धक्कादायक; शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणाऱ्या सोलापुरातील तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 15:30 IST2021-10-15T15:30:11+5:302021-10-15T15:30:36+5:30

अजयने लग्नास नकार दिल्यामुळे आरोपी अजय जाधव याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला

Shocking; Crime against a young man from Solapur for refusing to marry after sexual intercourse | धक्कादायक; शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणाऱ्या सोलापुरातील तरुणावर गुन्हा

धक्कादायक; शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणाऱ्या सोलापुरातील तरुणावर गुन्हा

सोलापूर : शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय यल्लाप्पा गायकवाड (वय २२, रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही दहावीमध्ये शिकत असताना आरोपी अजयसोबत तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर २०१९ मध्ये आरोपी अजय याने पीडित तरुणीला शाळेत येऊन आपण कुठेतरी बाहेर जाऊ, असे सांगत गाडीवर तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने घेऊन गेला. तेथे मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतरही दोघांचे भेटणे चालू होते. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये पीडित तरुणीचा एका तरुणाबरोबर विवाह ठरला. यामुळे अजय पीडित तरुणीला म्हणाला, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तू ठरलेले विवाह मोड. पीडितेने आपल्या कुटुंबीयांना अजयसोबत असलेल्या प्रेमाबद्दल माहिती दिली. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी ठरलेले लग्न मोडले. त्यानंतर जून २०२१ मध्ये आरोपी अजय याने पुन्हा पीडितेला दुचाकीवर घेऊन जात शरीरसंबंध ठेवले.

त्यानंतर मात्र अजयने लग्नास नकार दिला. पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी अजयच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. त्यानंतरही अजयने लग्नास नकार दिल्यामुळे आरोपी अजय जाधव याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Shocking; Crime against a young man from Solapur for refusing to marry after sexual intercourse