विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 17:22 IST2019-03-01T17:20:24+5:302019-03-01T17:22:41+5:30
होय...नगरची जागा काँग्रेसलाच

विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार
अकलूज (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागेवर निवडणूक लढवू पाहणारे शरद पवार प्रथमच विजयदादांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत स्पष्टपणे बोलले़ ‘विजयदादांचे पुनर्वसन कसे करणार?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, ‘माझ्या जागेवर विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार’.
अकलूज येथे शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते़ यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते पत्रकारांशी ते बोलत होते़ ‘नगरची जागा काँग्रेसला सोडणार का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले़ होय. क़ाँग्रेसला सोडणाऱ त्यानंतर त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावरही सडकून टीका केली.