शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

एटीपीतून सात लाखांची चोरी

By admin | Updated: June 25, 2014 01:46 IST

सात रस्ता केंद्रातील प्रकार

सोलापूर : महावितरणच्या सात रस्ता चौकातील एटीपी (एनी टाईम पेमेंट) सेंटर फोडून चोरट्याने ६ लाख ९२ हजारांची रोकड व धनादेश लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. प्रवीण उद्धवराव कुलकर्णी (वय ३०, रा. १/१, गणेश बिल्डर हौसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने सात रस्ता चौकात शासकीय विश्रामगृहाशेजारी विजापूर महामार्गाकडेला कित्येक दिवसांपासून एटीपी सेंटर उघडले आहे. कुलकर्णी यांनी हे सेंटर २३ जून रोजी रात्री दहा वाजता बंद केले. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता सेंटर उघडण्यास गेल्यावर त्यांना प्रवेशद्वाराच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडण्यात आल्याचे आढळले. आत पाहिल्यावर मशीनचे कॅश काऊंटर उचकटून चोरट्याने आतील ६ लाख ९२ हजार ४६० रुपये व बिलापोटी ग्राहकांनी दिलेले वेगवेगळ्या बँकांचे धनादेश चोरून नेल्याचे निदर्शनाला आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पो. नि. जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. एटीपी मशीन फोडून पैसे पळविण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. इतकी रक्कम असताना केंद्रातील सुरक्षेबाबत कसलीच काळजी घेतल्याचे दिसून आले नाही.