‘सेतू’ चालक झाला गायब !

By Admin | Updated: July 8, 2014 01:03 IST2014-07-08T01:03:40+5:302014-07-08T01:03:40+5:30

सेतूमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारे ठाकूर गायब

'Setu' driver disappeared! | ‘सेतू’ चालक झाला गायब !

‘सेतू’ चालक झाला गायब !


सोलापूर: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार सेतू चालकावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सेतूमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारे ठाकूर गायब झाले आहेत़
सेतूमध्ये गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली त्यावेळी ओळखपत्र नसणाऱ्या तसेच अनधिकृतपणे सेतूमध्ये दलालाचे काम करणाऱ्या दोघांना अटक केली होती़ दिलेल्या नियमाचे पालन न करता फसवणूक केली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सेतूवर गुन्हा नोंदविला शिवाय दोघांना ताब्यात घेतले होते़ सोमवारी पुन्हा प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी सेतूमध्ये भेट दिली़ शिवाय दोन बॉन्डरायटरना देखील त्यांनी ताब्यात घेण्याचे सांगितले़

Web Title: 'Setu' driver disappeared!