शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 13:18 IST

सहा लाखांसाठी स्वत:सह कुटुंबालाही संपवले; सोलापुरातील घटनेने सर्वत्र हळहळ

ठळक मुद्देअमोल जगताप याने राहत्या घरी पत्नी मयूरी, मुलगा आदित्य व आयुष या तिघांचा खून केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलयाबाबत मोठे बंधू राहुल अशोक जगताप (वय ४६, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली

सोलापूर : ‘मला सहा लाख रुपयांचं देणं आहे. माझ्या नावे असलेली संपत्ती विकून टाका आणि आलेल्या पैशांमधून नातेवाईक अन् इतरांचं देणं देऊन टाका. आम्हा सर्वांचे अवयवदान करा’, अशी चिठ्ठीत इच्छा व्यक्त करून अमोल जगताप याने दोन मुलांसह पत्नीचा खून करून आपली जीवनयात्रा संपवली. 

अमोल जगताप हे हांडे प्लॉट येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होते. पत्नी मयूरी, सात वर्षांचा मुलगा आदित्य व पाच वर्षांचा दुसरा मुलगा आयुष यांच्यासह ते राहत होते. कोंडी येथील हॉटेल गॅलक्सी हे डान्स बार चालवत होते. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्यामुळे अमोल जगताप हे आर्थिक अडचणीत आले होते. त्यांनी पूर्वी नातेवाईकांकडून सहा लाख रुपये घेतले होते. ते पैसे त्यांना परत करावयाचे होते. पैसे देणार असल्यामुळे अमोल जगताप हे तणावामध्ये आले होते, त्यांनी स्वत:ला, पत्नी व दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला.

 आत्महत्येपूर्वी जगताप यांनी चिठ्ठी लिहिली होती, त्यामध्ये त्यांनी मी, पत्नी व मुलांना संपवत असून स्वत:ही आत्महत्या करीत आहे. यामध्ये कोणालाही दोषी धरू नये, माझ्या नावे असलेली संपत्ती विकून त्यातून येणाºया पैशातून नातेवाईकांचे देणे देऊन टाकावे असे म्हटल होते. 

अमोलवर खुनाचा गुन्हा दाखलअमोल जगताप याने राहत्या घरी पत्नी मयूरी, मुलगा आदित्य व आयुष या तिघांचा खून केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोठे बंधू राहुल अशोक जगताप (वय ४६, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत. 

चौघांचा मृतदेह प्लास्टिकमध्ये..अमोल जगताप, त्यांची पत्नी व दोन मुले यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यापूर्वी प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये घालण्यात आला होता. सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती. प्लास्टिकच्या पिशवीत अ‍ॅम्ब्युलन्समधून चौघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

विवाहितेवर दोन भावंडांचा बलात्कार, हाताला झटका मारुन संशयिताचे पलायन

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस