विवाहितेवर दोन भावंडांचा बलात्कार, हाताला झटका मारुन संशयिताचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:21 PM2020-07-15T13:21:51+5:302020-07-15T13:27:06+5:30

याप्रकरणी बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape of two siblings on a married woman, escape of the suspect by slapping her hand | विवाहितेवर दोन भावंडांचा बलात्कार, हाताला झटका मारुन संशयिताचे पलायन

विवाहितेवर दोन भावंडांचा बलात्कार, हाताला झटका मारुन संशयिताचे पलायन

Next
ठळक मुद्देपीडित महिला व तिचा पती ढाके नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्य करतात तर संशयित कलशा व बलशा हे दोन्ही बाहू राजू बारी यांच्या शेतात वास्तव्याला आहेत.पीडितेवर बलात्कार होत असतानाच तिचा पती आला असता त्यांना पाहून बलशा पळून गेला तर कलशा याला दोघांनी धरुन ठेवले, मात्र त्याने हाताला झटका मारुन पलायन केले.

जळगाव : शेतमालकाने कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (दोन्ही रा. शिरसोली, ता.जळगाव) या दोघांनी २० वर्षीय विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री शिरसोली शिवारातील मोहाडी रस्त्यावरील ढाके यांच्या शेतात घडली. दरम्यान, पत्नीवर बलात्कार करताना पतीने एकाला पकडले, मात्र हाताला झटका देऊन तो पसार झाला. याप्रकरणी बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व तिचा पती ढाके नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्य करतात तर संशयित कलशा व बलशा हे दोन्ही बाहू राजू बारी यांच्या शेतात वास्तव्याला आहेत. कलशा याला दारु पिण्याची सवय असल्याने शेत मालकाने त्याला कामावरुन काढून टाकले. त्याचा राग मनात धरुन बलशा व कलशा हे मंगळवारी रात्री पीडित महिलेच्या घरी गेले व कलशा याला घरुन का काढून टाकले असा जाब बलशा याने पीडितेच्या पतीला विचारुन दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे घाबरलेला पीडितेचा पती मदतीसाठी ओळखीचे शांताराम बारेला यांना मदतीसाठी बोलावयला गेला असता त्या वेळेत कलशा व बलशा यांनी पीडितेवर बलात्कार केला. पीडिता धावत गेली असता कडेवर असलेल्या लहान मुलीला देखील त्यांनी बाजुला फेकून दिले. दरम्यान, पीडितेवर बलात्कार होत असतानाच तिचा पती आला असता त्यांना पाहून बलशा पळून गेला तर कलशा याला दोघांनी धरुन ठेवले, मात्र त्याने हाताला झटका मारुन पलायन केले.


रुग्णालयात नोंदविला जबाब
दरम्यान, या घटनेनंतर पोलीस पाटलाने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानव संसाधन विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेचा रुग्णालयात जावून जबाब नोंदविला. त्यानंतर कलशा व बलशा यांच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

Web Title: Rape of two siblings on a married woman, escape of the suspect by slapping her hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.