एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 08:05 PM2020-07-14T20:05:10+5:302020-07-14T20:08:15+5:30

तीन पिस्तुल आणि काडतुसे जप्त : गुन्हे शाखेची कारवाई 

MBA student arrested, two arrested with 3 pistols | एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

Next
ठळक मुद्दे शशांक सुनील समुद्रे (वय २२, रा. पाचपावली) आणि ऋषभ राकेश शाहू  (वय २१,रा. कमाल चौक) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. पुढील तपास सुरू आहे.

नागपूर : गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पिस्तुलाची खेप घेऊन आलेल्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तूल तसेच सात जिवंत काडतुस आणि बोलेरो कार असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.


शशांक सुनील समुद्रे (वय २२, रा. पाचपावली) आणि ऋषभ राकेश शाहू  (वय २१,रा. कमाल चौक) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे चेनस्नेचिंग पथक सोमवारी रात्री गिट्टीखदान परिसरात गस्त करीत असताना त्यांना एका खबर्‍याने सेमिनरी हिल टीव्ही टॉवर चौकात एक जण बोलेरोत पिस्तूल घेऊन असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने तिकडे धाव घेऊन बोलेरो मध्ये बसलेल्या आरोपी समुद्र आणि शाहूची चौकशी केली. त्यांच्याकडे तीन पिस्तूल मॅगझीन आणि सात जिवंत काडतुस सापडले. आरोपींकडे पांढऱ्या रंगाची बोलेरोही होती. पोलिसांनी समुद्रे आणि शाहूला ताब्यात घेऊन त्यांचे वाहन आणि पिस्तूल जप्त केले. त्यांच्या विरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. निलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हेमंत थोरात, राजेश लोही, हवलदार अफसर खान पठाण, सतीश ठाकुर, नायक दयाशंकर बिसांदरे, शिपाई हिमांशू ठाकूर आणि  विकास पाठक यांनी ही कामगिरी बजावली.

आरोपी उच्चशिक्षित 
पोलिसांनी पिस्तुलासह पकडलेला आरोपी शशांक समुद्रे हा एमबीएचा विद्यार्थी आहे. हे पिस्तूल यशोधरानगरातील अनु ठाकूर याच्याकडून आपण घेतल्या होत्या, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. अनु ठाकुरची काही दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. पुढील तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

 

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

 

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

 

दुष्काळात तेरावा महिना! मेडिकलमध्ये औषध घ्यायला गेलेल्या आजोबांच्या पेन्शनच्या पैशावर चोरट्यांनी मारला डल्ला 

 

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Web Title: MBA student arrested, two arrested with 3 pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.