शाळेतील शिक्षकांनीच केला मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:11 IST2019-04-01T21:10:08+5:302019-04-01T21:11:36+5:30

पंढरपूर शहरातील निवासी मूकबधिर शाळेतील घटना

School teachers tortured girls | शाळेतील शिक्षकांनीच केला मुलींवर अत्याचार

शाळेतील शिक्षकांनीच केला मुलींवर अत्याचार

ठळक मुद्दे- निर्भया पथकामुळे आला प्रकार उघडकीस- चार शिक्षकांना पंढरपुर शहर पोलीसांनी केली अटक- गजाआड शिक्षकांना २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पंढरपूर : निवासी मूकबधिर शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतील चार शिक्षकच लैंगिक अत्याचार करीत असल्याचा लाजिरवाणा प्रकार निर्भया पथकामुळे उघडकीस आला. निर्भया पथकामुळे मूकबधिर मुलींवर होणाºया अन्यायाला वाचा फुटून चार नराधम शिक्षकांना गजाआड करण्यात आले आहे. 

 पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमधील निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांच्या पथकाने अचानक निवासी मूकबधिर शाळेची तपासणी केली. या निवासी शाळेत ४० मुली पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

महिला पोलीस कॉन्स्टेबल शबाना मणेर यांनी प्रत्येक मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, चार अल्पवयीन मुलींनी आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत शाळेतील शिक्षकच आमच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले. त्यावरून महिला पोलीस कॉन्स्टेबल शबाना मणेर यांनी फिर्याद दिली. शिक्षक ज्ञानोबा मल्हारी मस्के, अर्जुन तुकाराम सातपुते, संतोष बाळासाहेब कुलाल, सिद्धेश्वर शंकर वाघमोडे या चार नराधम शिक्षकांवर पोस्को अ‍ॅक्ट व ३५४ (अ), ३५४ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून व तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे करीत आहेत.

 

Web Title: School teachers tortured girls