शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

वाळू तस्कराने पोलिसांच्याच अंगावर घातला ट्रॅक्टर; कोरवली शिवारातील थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:00 PM

एक पोलीस जखमी, आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू

ठळक मुद्देजिल्ह्यातील वाळूचे ठेके बंद असल्याने वाळूमाफियांचा वाळू चोरीचा धंदा जोरात चालूचजीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अवैध वाळू उपसा कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पोलिसांच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

कुरुल : जिल्ह्यातील वाळूचे ठेके बंद असल्याने वाळूमाफियांचा वाळू चोरीचा धंदा जोरात चालूच आहे. याला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या जीवावरच हे वाळूचोर उठले असल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा मोहोळ-विजयपूर रस्त्यावरील कोरवली हद्दीत घडली आहे. कारवाई करत असताना वाळू चोरांनी चक्क ट्रॅक्टर पोलिसांच्याच अंगावर घातला.

रात्री उशिरा कोरवली हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेल्या कामती पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना गुंजेगाव रस्त्याने सीना नदीतून वाळू चोरी करून कोरवली हद्दीत ट्रॅक्टर घेऊन चार जण निघाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या वाहनाची चौकशी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या समोर पोलीस नाईक माळी व यलपले यांनी मोटरसायकल (क्रमांक एम. एच. १३/ सी. झेड. ६२६८) आडवी लावून थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने पोलिसांनाच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मोटरसायकलला ठोकरून ट्रॅक्टरसह चार जणांनी पलायन केले.

 यात पोलीस शिपाई चंद्रकांत माळी हे जखमी झाले असून, मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कामती पोलीस ठाण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ-विजयपूर रस्त्यावर असलेल्या कोरवली हद्दीत सोमवारी रात्री उशिरा हायवे पेट्रोलिंगचे पोलीस नाईक चंद्रकांत माळी व येलपले हे गेले असता त्यांना कोरवली कॅनॉलवर वाळू चोरीचा ट्रॅक्टर उभारला असल्याचे समजले. त्यामुळे अवैध वाळू उपसा कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पोलिसांच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल- बब्रुवान गंगाप्पा लोणारी, व्यंकटेश बब्रुवान लोणारी, मारुती बब्रुवान लोणारी व एक अनोळखी इसम (सर्व जण रा . गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी दोन पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून ३०७, ३५३, ३३२ ,३७९ ,३४ व पर्यावरण संरक्षण अधिनियम ९ व १५ अन्वये कामती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार झाले        आहेत. सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे तपास करीत असून, आरोपींचा शोध चालू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसriverनदी