शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारचा परतीचा प्रवास पंढरपुरातून सुरू होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:20 IST

यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री विजय देशमुख, खासदार सिद्धेश्वर स्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत पारिचारक, माजी ...

यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री विजय देशमुख, खासदार सिद्धेश्वर स्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत पारिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे यांना सोबत घेऊन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गल्लोगल्ली आपल्या बैठकांचा जोर लावला आहे. त्यांनी पंढरपूर शहरात व्यापारी, लायन्स, जायंटस्‌, ‘रोटरी’सह स्वयंसेवी संस्थांशी संवाद, लोकप्रतिनिधी-पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या गाठीभेटी, नेत्यांची नाराजी काढण्याचे काम खासदार रणजितसिंह सध्या करत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची सर्व सूत्रे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हातात देण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतलेला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. माजी मंत्री श्री बाळा भेगडे यांनी प्रचारयंत्रणाचे सूत्र हाती घेत नियोजन करून संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सभा

निवडणूक निश्चित झाल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नियोजनबद्ध प्रचार करत मतदारसंघावर पकड मिळविली आहे. भाजपच्या विविध आघाडी, सेलच्या प्रमुखांनी स्थानिक पातळीवर प्रचाराचे योग्य नियोजन करत आघाडी सरकारविरोधात रान तापविले असताना विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मतदारसंघाची प्रमुख जबाबदारी असलेले माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह भाजपचे अनेक माजी मंत्री या मतदारसंघांत प्रचारात आघाडी सांभाळत आहेत. मात्र, शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या सभांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे कोण-कोण भाजपमध्ये प्रवेश करणार, किती संघटना पाठिंबा देणार याविषयीची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. प्रचाराच्या दृष्टीने सोमवार, मंगळवार महत्त्वाचे मानले जात आहेत.