शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एमआरईजीएसच्या कामाला लाल फुली प्रशासनाचा नाकर्तेपणा;

By admin | Updated: May 9, 2014 00:29 IST

मागणी नसल्याचे सांगितले जाते कारण

सोलापूर : एमआरईजीएसमधून यावर्षी गांडूळ खतनिर्मिती, शेततळे व सिमेंट नालाबांधची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील सांगत असताना मागील दोन वर्षांपासूनच ही कामे प्रस्तावित असली तरी मागणीच नसल्याचे जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शेतकर्‍यांसाठी काहीच करायचे नाही?, असा पवित्रा प्रशासन व पदाधिकार्‍यांनी घेतल्याचा हा परिणाम आहे.सध्या जिल्‘ाला रस्त्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. गावोगावी पाणंद रस्त्याची मागणी आहे. पदाधिकारी व प्रशासनाने गावोगावच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी आहे. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी त्या शेतकर्‍यांची तयारी नाही. त्या मोबदल्यात मागणी असलेल्या गावात नव्याने विहिरींचे प्रस्ताव मंजूर करण्याचीही शेतकर्‍यांची मागणी आहे. याशिवाय जनावरांसाठी गोठा, गांडूळ खतनिर्मितीच्या कामांची मागणी आहे. ही मागणी असताना जिल्हा परिषद व यंत्रणेकडे कसलेच नियोजन नाही. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी गांडूळ खतनिर्मिती, शेततळी व सिमेंट नालाबांधाची कामे यावर्षी घेणार असल्याचे बुधवारी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी एम.आर.ई.जी.एस. मधून शेततळ्यांची कामे घेण्यासाठी शेतकर्‍यांची मागणीच नाही, परंतु राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेततळे होऊ शकतात, असे सांगितले. एम.आर.ई.जी.एस. मधून सध्या कोणत्याच कामाची मागणी नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सांगितले. -------------------------------------लोकांनी शेततळे व फलोत्पादनासाठी कृषी खात्याकडे मागणी नोंदवावी. एन.एच.एम.(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) मधून शेततळ्याला मागणी आहे़ एम.आर.ई.जी.एस.मधून शेततळे करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. गांडूळ खताची मागणी कोणी केली तर विचार करु.रफिक नाईकवाडीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ------------------------------------पाणंद रस्ते, जनावरांचा गोठा, खतनिर्मिती प्रकल्प ही कामे दोन वर्षांपासून प्रस्तावित आहेत. मागणीच नसल्याने ही कामे हाती घेऊ शकलो़ गावागावांतून विहिरींच्या कामांची मागणी आहे. मागणीप्रमाणे रस्त्यांची कामे सुरू आहेत.मनीषा देसाईउपमुख्य कार्यकारी अधिकारी------------------------------------महसूलने कामे करणार्‍यांना लटकावलेएम.आर.ई.जी.एस. ही योजना केवळ विहिरींच्या कामामुळे जिल्‘ातील गावोगावी पोहोचली. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विहिरींची कामे केल्यानेच अनेक कुटुंबांची शेती बागायती झाली आहे. परंतु पैशाच्या मागणीच्या, तांत्रिक बाबीवर बोट ठेवत महसूल खात्याने जि.प. ग्रामपंचायत विभागाला अडचणीत आणले. त्यामुळे आज जि.प.ची यंत्रणाही कामे करण्यास तयार नाही.