दिल्ली काँग्रेसनेच पेटवली, रामदास आठवलेंनी CAAवरून साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 20:13 IST2020-02-25T20:13:03+5:302020-02-25T20:13:21+5:30

देशाच्या राजधानीत हिंसाचार सुरू आहे.  दिल्लीमध्ये काँग्रेस असून, दिल्ली ही काँग्रेसनेच पेटवली आहे

Ramdas athavale comments on Delhi Congress burned | दिल्ली काँग्रेसनेच पेटवली, रामदास आठवलेंनी CAAवरून साधला निशाणा

दिल्ली काँग्रेसनेच पेटवली, रामदास आठवलेंनी CAAवरून साधला निशाणा

पंढरपूर : देशाच्या राजधानीत हिंसाचार सुरू आहे.  दिल्लीमध्ये काँग्रेस असून, दिल्ली ही काँग्रेसनेच पेटवली आहे. यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामध्ये दिल्ली पेटले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आपली भूमिका असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात व्यक्त केले. 

पंढरपूर येथे संतांचा मेळाव्यानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजाभाऊ सर्वगोड, सुनिल सर्वगोड उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, दिल्लीमध्ये काँग्रेसच आहे. त्यामुळे दिल्ली पेटविण्याचे काम काँग्रेसच करेल. अमेरिकेचे आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षांपासून फार चांगले आहेत. काँग्रेसच्या काळातही भारतातील अमेरिकेचे संबंध चांगले होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आणि दिल्लीमध्ये झालेला वादंग. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. आणि दोषींवर कारवाई देखील होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Ramdas athavale comments on Delhi Congress burned