शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी स्वतंत्र फिडर देणार

By admin | Updated: July 8, 2014 00:53 IST

उदय सामंत; मंगळवेढ्यातील बैठकीत आश्वासन

मंगळवेढा : मंगळवेढा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उचेठाण येथे स्वतंत्र फिडर व नगरपालिकेसाठी आठवडाभरात स्वतंत्र अभियंता दिला जाईल. कृष्णा तलाव सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.उचेठाण येथे स्वतंत्र फिडर नसल्यामुळे शहराला लोडशेडिंग कालावधीमध्ये पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे. जिल्हा रुग्णालय व पाणीपुरवठा यासाठी एक्स्प्रेस फिडर राज्यात सगळीकडे बसविण्याचा निर्णय झाला आहे. एक्स्प्रेस फिडरसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मंगळवेढा नगरपालिकेला पूर्णवेळ नगर अभियंता नसल्यामुळे पाच कोटींची विकासकामे रखडली असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सामंत म्हणाले की, येत्या आठवडाभरात अभियंता दिला जाईल.दरम्यान, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर या प्रभावीपणे काम करीत नसल्यामुळे त्यांची बदली करून सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे यांनी मंत्र्यांकडे केली. याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. याचबरोबर कृष्णा तलाव विकसित करणे, सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामास व भुयारी गटार योजना, शहरातील रस्ते व आरक्षित जागा विकसित करणे आदींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी खवतोडे यांनी केली.नगरपालिकेकडे सध्या २२ सफाई कर्मचारी कार्यरत असून, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी २५ सफाई कामगारांची आवश्यकता आहे. ही पदे वाढवून मिळावीत, या मागणीचे निवेदन यावेळी बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष खंडू खंदारे यांनी दिले. यावेळी आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, पक्षनेते भारत नागणे, विरोधी पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक महादेव जिरगे, चंद्रखेशर कोंडुभैरी, सुनील नलवडे, गौरीशंकर बुरकूल, दत्तात्रय यादव, विलास मोडक, मुरलीधर घुले, रामचंद्र कोंडुभैरी, कैलास कोळी, विजय बुरकूल, बाबा कोंडुभैरी उपस्थित होते.