सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 14:18 IST2019-09-01T14:15:06+5:302019-09-01T14:18:24+5:30

आज अमित शहा सोलापूर दौºयावर; प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शहर पोलीसांची कारवाई 

Police in the custody of the Bhim Army workers, including Congress, NCP, in Solapur | सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

ठळक मुद्दे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सोलापूर दौºयावर- अमित शहाच्या दौºयामुळे सोलापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त- इंदिरा गांधी मैदानावर होणार सायंकाळी सातच्या सुमारास जाहीर सभा

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सोलापूर दौºयावर आहेत. अमित शहा यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काँग्रेसच्या एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष सुहास कदम, भीम आर्मीचे कार्यकर्ते विकी कांबळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

गणेश डोंगरे व सुहास कदम यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयामध्ये निदर्शने केली होती. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भीम आर्मीच्यावतीने गृहमंत्री अमित शहा यांची सभा उधळून लावणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

पोलिसांनी भीम आर्मीचे विकी कांबळे यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्वाना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सोलापूर शहर पोलीसांनी दिली.




 

Web Title: Police in the custody of the Bhim Army workers, including Congress, NCP, in Solapur