शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सोलापूर शहरासाठी एकरुख तलावात पाणी सोडण्याची योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:09 AM

नियामक मंडळाची मान्यता; आवश्यक निधीची जबाबदारी महानगरपालिकेवर

ठळक मुद्देशिरापूर उपसा सिंचन योजनेतून सोलापूर शहरासाठी एकरुख तलावातून पाणी योजना महानगरपालिका निधीची जबाबदारी घेतल्यानंतरच प्रत्यक्षात अंदाजपत्रक तयार केले जाईल. 

सोलापूर: सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या मार्डी उजव्या वितरिकेतून एकरुख तलावात पाणी सोडण्याच्या योजनेला नियामक मंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. या कामासाठी येणारा खर्च महानगरपालिका, सीएसआर फंड किंवा जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्याची अट घातली आहे.

सध्या सोलापूर शहराला उजनी धरणातून थेट पाईपलाईन व धरणातून भीमा नदीतून औज बंधाºयापर्यंत पाणी सोडले जाते. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी २३२ किलोमीटर अंतर कापून औज बंधाºयात येते. हे अंतर कापत असताना धरणातून औज बंधाºयात दोन टीएमसी पाणीसाठा करण्यासाठी ७ टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडावे लागते. याशिवाय हे पाणी पुन्हा मोटारीने उचलून सोलापूरपर्यंत येते. यापेक्षा पाणी बचतीसाठी दुसरा मार्ग म्हणून शिरापूर उपसा सिंचन योजनेतून एकरुख तलावात पाणी सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे ८ आॅगस्ट २०१९ रोजी सादर झाला होता. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे ढोबळ अंदाजपत्रक करुन प्रस्ताव शासनाला पाठविला होता.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गेलेल्या या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करेपर्यंत विधानसभा निवडणुका सुरू झाल्या. आचारसंहितेअगोदर हा प्रस्ताव शासनाकडे गेला, मात्र नियामक मंडळाची मान्यता नसल्याने परत आला होता. मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळ बैठकीत जलसंपदा प्रधान सचिव इकबाल चहल, सचिव (लाभक्षेत्र) आर. आर. पवार, कार्यकारी संचालक खलिल अन्सारी, मुख्य अभियंता विलास रजपूत आदी उपस्थित होते. आता महानगरपालिकेने या कामासाठी स्वत:च्या निधीतून किंवा सीएसआर निधी किंवा जिल्हा नियोजनमधून ९ कोटी रुपयांची तयारी दर्शवली तर शासन या कामाला मंजुरी देणार आहे. 

दीड किलोमीटर पाईपलाईन...

  • - शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या ७ किलोमीटरपासून मार्डी वितरिकेतून साधारण १२०० मि.मी. व्यासाच्या १५६० अंतराच्या दोन रांगा बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येतील. ७ व्या किलोमीटरपासून हे पाणी मार्कंडेय ओढ्याजवळ येईल. 
  • - यामुळे सध्याचे उजनी धरणातून औज बंधाºयापर्यंत २३२ किलोमीटरऐवजी बोगद्यातून शिरापूर बंधाºयापर्यंत ८५ किलोमीटर एवढेच अंतर पाण्याला कापावे लागणार आहे.
  • - याशिवाय सध्या भीमा नदीतून सोडलेले पाणी महाराष्टÑातील शेतकºयांपेक्षा कर्नाटकच्या शेतकºयांसाठी फारच फायद्याचे ठरत आहे ते नव्या योजनेमुळे होणार नाही. झाला तर सीना नदीकाठच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनाच फायदा होईल. 

शिरापूर उपसा सिंचन योजनेतून सोलापूर शहरासाठी एकरुख तलावातून पाणी योजना राबवली तर महानगरपालिकेचा पैसा व धरणातील पाणी वाचणार आहे. महानगरपालिका निधीची जबाबदारी घेतल्यानंतरच प्रत्यक्षात अंदाजपत्रक तयार केले जाईल. - रमेश वाडकरकार्यकारी अभियंता, उजनी कालवा क्र.८ 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका