शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींमध्ये भाविकांचा भरणा

By admin | Updated: July 8, 2014 01:12 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष; भाविकांच्या जीवाला धोक्याची शक्यता

पंढरपूर: पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती असून, यांची संख्या पाचशेच्या वर आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असतानाही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. यामुळे सध्या इमारत मालक बाहेरून आलेल्या वारकऱ्यांना वास्तव्य देत असल्याने भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.पंढरपुरात मंदिर परिसरासह अनेक गल्ली-बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. यामध्ये घरापासून ते मठ, धर्मशाळा, वाड्याचा समावेश असला तरी यात मोठ्या प्रमाणात महाराजांचे वाडे अधिक आहेत. पंढरपूर नगरपालिकेने या धोकादायक इमारत मालकांना सूचना देऊन पाडण्याचे आवाहन केले आहे; मात्र मालकांनी याकडे दुर्लक्ष केले असून, यामुळे पंढरीत धोकादायक असलेल्या अनेक इमारती तशाच आहेत. सध्या वारीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने बिनदिक्कतपणे वारकऱ्यांना यामध्ये राहण्यासाठी जागा दिली जात आहे. यामुळे वास्तव्य करणाऱ्या वारकऱ्यांसाठी या इमारती धोकादायक बनल्या आहेत. नगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारती जाहीर करून त्यावर इमारत धोकादायक असल्याबाबत सूचनाही त्या इमारतीवर लिहिल्या आहेत; मात्र असे असतानाही ऊन, वारा व पावसापासून बचाव करण्यासाठी वारकरी या इमारतींचा आधार घेत असून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.---------------------------------पावसामुळे अधिक धोकावारीच्या काळात सध्या पाऊस पडत असल्याने धोकादायक इमारती पडण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे वारकऱ्यांसाठी या इमारतीमध्ये राहण्यापासून लांब ठेवण्यासाठी पंढरीत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.