शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरा समीप आली वैष्णवांची मांदियाळी

By admin | Updated: July 6, 2014 00:12 IST

आज तालुक्यात प्रवेश; पददर्शनासाठी सहा तासांचा कालावधी

 पंढरपूर: करा करा लागपाठ। धरा पंढरीची वाट।... असे म्हणत विठ्ठलाच्या दर्शन ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या पालख्या व संतांची मांदियाळी पंढरपुराजवळ आली आहे. आता त्यांना विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे. ज्ञानोबा, तुकोबा यांच्यासह सर्व उद्या पालख्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत.मैलोन्मैल पायी प्रवास करीत पंढरीत दाखल होण्यासाठी आतुर झालेल्या पालख्या, दिंड्या, वारकरी पंढरपूर समीप आल्याच्या भावनेने भारावून गेले असून, रविवारी टप्पा ओलांडून माऊलींसह तुकोबारायांची पालखीही पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. पालख्या माळशिरस तालुक्यात असल्याने व पंढरपूर जवळ आल्याने काही वारकरी पुढे येऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत थांबत असून, यामुळे पददर्शन रांग ज्ञानेश्वर सभामंडप, सेतू, विणे गल्ली, सारडा भवन पार करीत गोपाळपूर रस्त्यावर बांधलेल्या नऊ दर्शन पत्राशेडमधील पाच शेडपर्यंत पोहोचली आहे. एका वारकऱ्याला दर्शनासाठी सहा तासांचा कालावधी लागत असून, मुखदर्शन व आॅनलाईन दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. आणखीही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सध्या पददर्शन रांगेत ४0 हजार भाविक असून, वाळवंटात २५ हजार, मठ, मंदिरे, धर्मशाळा, व अन्य ठिकाणी १ लाख २५ हजार असे १ लाख ९0 हजार भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पददर्शन रांगेत मंदिर समितीतर्फे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. -----------------------------घुसखोरी रोखण्यासाठी यंत्रणापददर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे घुसखोरीवर आळा घालणे शक्य झाले आहे. कोणी घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रांगेतून पुन्हा बाहेर काढण्यात येत असल्याने दर्शनाचा वेग वाढला आहे.