शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीसमीप वैष्णव दंगले रिंगणी

By admin | Updated: July 8, 2014 00:57 IST

तुकोबाराय वाखरी मुक्कामी : बाजीराव विहिरीजवळ रिंगण

मोहन डावरे ल्ल पंढरपूरदासां सर्वकाळ।तेथे सुखाचे कल्लोळ।।जेथे वसती हरीचे दास।पुण्य पिके पापानास।।फिरे सुदर्शन।घेऊनियां नारायण।।तुका म्हणे घरी।होय म्हणियारा कामारी।।ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष... पंढरपूर जवळ येत असल्याचा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद... आणि हरिनामाचा गजर... अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण बाजीराव विहीर येथे उत्साहात पार पडले.पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील तालुक्यातील पहिला मुक्काम उरकून श्रीसंत तुकाराम महाराज पालखीने सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पिराची कुरोली येथून प्रस्थान ठेवले. दुपारी दोनच्या दरम्यान वाडीकुरोली-कोळ्याचा मळा येथे दुपारचा विसावा झाल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखीने रिंगण सोहळ्यासाठी वाखरी-बाजीराव विहिरीकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर पालखी मार्गावर भजन, कीर्तन, मनोरे, फुगड्या आदी पारंपरिक खेळ खेळत वैष्णवांचा मेळा सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बाजीराव विहीर येथे पोहोचला. या ठिकाणी रिंगण सोहळ्यासाठी पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी अर्धा तास प्रथम वीणेकरी, झेंडेकरी, टाळकरी यांचे चोपदारांनी रिंगण लावले.यानंतर ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, अभंग, कीर्तनात वैष्णवांच्या मेळ्याने हवेत उंच उड्या घेऊन गजर केला. नंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिवसभराच्या कडक उन्हानंतर ढगाळ वातावरणात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात तुकोबांच्या अश्वाने पालखीला दोन फेऱ्या मारल्यानंतर वैष्णवांनी खारीक-खोबरे उधळून रिंगण सोहळा पार पडल्याचे उड्या मारून स्वागत केले.हा रिंगण सोहळा डोळ्यांत टिपण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांवर, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांची पथके, मदतीला अग्निशमन दलाची वाहने व स्थानिक सुरक्षा दलाची पथकेही घेण्यात आली होती. रिंगण सोहळ्यानंतर पंढरपूर जवळ येत असल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. रिंगण सोहळ्यानंतर झपझप पावले टाकत वैष्णवांच्या मेळ्याने वाखरीकडे प्रस्थान ठेवले. सोमवारी सायंकाळी शेवटचा मुक्काम वाखरी येथे होणार आहे. ------------------------------पारंपरिक खेळरिंगण सोहळ्याअगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळा पार पडण्याच्या काही वेळ अगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी मनोरे उभे करून फुगड्या खेळून, चुळचुळ मुंगळा पळी पळी तेल आदी पारंपरिक खेळ खेळून वारकऱ्यांनी एकमेकांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिंगण सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी आलेल्या भाविकांचाही उत्साह वाढत होता.---------------------------रांगोळीच्या पायघड्यातुकोबांचे उभे रिंगण लावण्याअगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाल रंगाच्या दोन रेषा मारण्यात आल्या होत्या. मध्यभागी आकर्षक पांढऱ्याशुभ्र रंगाच्या रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिंंगण सोहळ्याला उपस्थित असणारे वारकरी व भाविकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.