शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

मिशन-अ‍ॅडमिशन; जागा केवळ ५९ हजार अन् दहावी पास झाले ६१ हजार ६३३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:19 PM

अकरावीच्या प्रवेश जागांपेक्षा सोलापुरातील अडीच हजार विद्यार्थी जास्त

ठळक मुद्देसोलापूरच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहेमागील वर्षी जिल्ह्याचा ८१.४३ टक्के निकाल लागला होतायंदा ९६.७३ टक्के मुले तर ९८.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या

सोलापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दुपारी दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेतÞ तर अकरावीसाठी केवळ ५९ हजार ४० जागा आहेत. यामुळे जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाचा प्रश्न उद्भवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, जिल्ह्याबाहेर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांमुळे हा प्रश्न निकाली निघेल, असे अधिकाºयांनी सांगितले.

मुळातच हा निकाल अनेक दिवसांपासून रखडला होता. सोलापूरच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्याचा ८१.४३ टक्के निकाल लागला होता तर या वर्षी ९७.५३ टक्के निकाल लागला आहेÞ. याच बरोबर यंदा ९६.७३ टक्के मुले तर ९८.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील ४६९ शाळांचा निकाल ही शंभर टक्के लागला आहे.Þअकरावीच्या प्रवेशासाठी असलेल्या जागा आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी र्यांची संख्या जास्त आहेÞ. पण काही विद्यार्थी शहर सोडून इतर जिल्ह्यात प्रवेश घेतात. काही विद्यार्थी इतरत्र जातात. यामुळे प्रवेशाचा प्रश्न उद्भवणार नाही, असे मत अधिकाºयांकडून  व्यक्त केले.

अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीसध्या काही महाविद्यालयांची अकडेवारी जोडली गेली नाही. यामुळे अकरावी प्रवेशासंबंधी विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होईल असे दिसते. पण असे होणार नाही. एकही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही. अशी ग्वाही शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय