Join us  

Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 1:18 PM

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची देशात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. दरम्यान, या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवारही त्यांच्याविरोधात होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारामती तालुक्यात फिरुन प्रचार केला आहे. दोन्ही भावांनी एकमेकांविरोधात टीकाही केल्या होत्या. दरम्यान, आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'बोल भिडू' या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवास पवार यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांच्यात बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. श्रीनिवास पवार हे पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात प्रचारासाठी दिसले. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आणि मुलागाही   सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात होते. आज मुलाखतीत अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार म्हणाले,आताही  बारामती लोकसभेत मी उभा केलेल्या उमेदवाराऐवजी दुसरा उमेदवार उभा केला असता तर श्रीनिवास पवार आणि त्यांच्या परिवाराने माझंच काम केलं असतं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.  पवार म्हणाले, श्रीनिवास पवार यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की मी तुझच काम करणार आहे, पण उमेदवारी झाल्यानंतर त्यांनी मला काम करणार नाही असं सांगितलं. त्याच्या खोलात मी जास्त गेलो नाही, प्रत्येकाच काहीतरी म्हणण असू शकतं, असंही अजित पवार म्हणाले. उमेदवारीच नाव अंतिम होत असताना श्रीनिवास पवार यांनी सांगितलं होत की, हा उमेदवार देऊ नका, आम्ही का करु शकणार नाही. 

वरिष्ठांनी चार खाती आणि चार मंत्रीपद जास्त घेऊ अंस सांगितलं

२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठं यश आलं होतं, यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळत होतं, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "२००४ मध्ये मी आणि आर आर आबा दिल्लीला गेलो होतो तेव्हा आम्ही प्रत्येकाच म्हणण जाणून घ्या असं सांगितलं होतं. आमदारांच बहुमत जाणून घ्या. ते जास्तीत जास्त ज्याला सपोर्ट करतील त्यांना जबाबदारी असं सांगितलं. आर आर आबांना तेव्हा नेते म्हणून निवडण्यात आलं. पण, वरिष्ठांनी चार खाती आणि चार मंत्रीपद जास्त घेऊ आणि मुख्यमंत्री त्यांना देऊ असं सांगितलं, असंही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :अजित पवारलोकसभा निवडणूक २०२४शरद पवारमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४