शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मुलींच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मातेनं गहाण ठेवलं सौभाग्याचं लेणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:49 IST

एका आईनं विकली कर्णफुले; जुने मोबाईल खरेदी केल्यानंतर सुरू झाला अभ्यास

ठळक मुद्देमुलांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी स्मार्टफोन विकत घेण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होतासोलापुरातील मड्डीवस्तीतील दीपाली अलकुंटे आणि जयश्री अलकुंटे या  दोघी माऊलीचं हातावरचे पोट

सोलापूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळ्याचं जगणंच बदललं आहे. सर्वात जास्त फटका बसला तो विद्यार्थ्यांना. शाळा बंद असल्याने सर्वांनी ऑनलाइनशिक्षण सुरु केलंय. सोलापुरातील मड्डीवस्ती इथं मुलींच्या शिक्षणासाठी एका आईने चक्क आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं तर दुसºया मुलीच्या आईने आपल्या कानातील सोन्याचे फूल विकून जुना स्मार्टफोन खरेदी केला आहे.मार्च महिन्यात शाळा बंद झाल्या. स्मार्टफोनअभावी मुलांना अभ्यासात अडचणी येत होत्या. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन घोषित केल्यामुळे शाळा ऑनलाइन सुरु झाल्या. 

मुलांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी स्मार्टफोन विकत घेण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता.सोलापुरातील मड्डीवस्तीतील दीपाली अलकुंटे आणि जयश्री अलकुंटे या  दोघी माऊलीचं हातावरचे पोट असून, त्यांचे पती दगडावर नक्षीकाम करून उखळ, पाटा आणि इतर साहित्य बनवण्याचे काम करतात. दोघींच्या मुली वीरतपस्वी शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत आहेत; मात्र घरात मोबाईल नसल्याने यांच्या दोन्ही मुलींचा अभ्यास काही होत नव्हता. 

ना कर्ज, ना मदत..नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी दोन्ही मातांनी बँक, नातेवाईक यांच्याकडे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला; पण ते मिळाले नाही तसेच कोणी मदतही केली नाही. अखेरीस फक्त तीन हजार रुपयांसाठी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले. शिवाय आणि कानातील फुले विकावी लागली. त्या पैशातून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन घेतला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणonlineऑनलाइनGoldसोनं