ट्रकचालकाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप

By Admin | Updated: July 8, 2014 00:41 IST2014-07-08T00:41:53+5:302014-07-08T00:41:53+5:30

ट्रकचालकाचा खून

One killed in the murder of a trucker | ट्रकचालकाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप

ट्रकचालकाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप


सोलापूर : किरकोळ कारणावरून नवनाथ विभीषण कणसे (वय-५०, रा. मोडनिंब, ता. माढा) या ट्रकचालकाचा खून केल्याच्या आरोपावरून गणेश पोपट शिंदे (वय-२६, रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. १० जानेवारी २०१४ रोजी दुपारी गणेश शिंदे हा एमएच-४२/बी-८७११ हा ट्रक घेऊन कुर्डूवाडीतील मार्केट यार्डात असलेल्या संचेती यांच्या दुकानासमोर आणला. त्याच्यासोबत पहिला चालक सज्जन महादेव गिड्डे हाही होता. ट्रक थांबल्यानंतर कणसे हा लघुशंकेसाठी ट्रकच्या मागे गेला. ‘येथे लघवी का करतो’ असा जाब विचारत गणेश शिंदे याने त्याच्यावर चाकूने वार केला.

Web Title: One killed in the murder of a trucker