प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास  

By Appasaheb.patil | Published: January 26, 2024 09:02 AM2024-01-26T09:02:02+5:302024-01-26T09:02:13+5:30

मंदिर परिसराचे रुप विलोभनीय, मनमोहक दिसत आहे.

On the occasion of Republic Day, Vitthal, Rukmini in Pandpur lay flowers in the womb of Mata. | प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास  

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास  

सोलापूर : आज प्रजासत्ताक दिन. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी एक असणाऱ्या श्री विट्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसराचे रुप विलोभनीय, मनमोहक दिसत आहे.

दरम्यान, या सजावटीत झेंडु, शेवंती, लव्हेन्डर, गुलाब तसेच कामिनीचि पाने ,गुलाब अशा विविध फुलांचा वापर करुन श्री विठ्ठलाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप, रुक्मिणीमातेचा गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

Web Title: On the occasion of Republic Day, Vitthal, Rukmini in Pandpur lay flowers in the womb of Mata.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.