शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांसह १५० कर्मचाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: June 20, 2014 00:46 IST

मनपा : हद्दवाढ भरती प्रकरण

सोलापूर: हद्दवाढ भरतीप्रकरणी महापालिकेने ३०० पैकी १५० कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत़ यामध्ये उपमहापौर हारुन सय्यद यांचा देखील यात समावेश असून, मनपामध्ये हे भरती प्रकरण सध्या जास्त गाजत आहे़ उर्वरित १५० कर्मचाऱ्यांनादेखील लवकरच नोटिसा पाठविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी पत्रकारांना दिली़ याप्रकरणी त्यावेळच्या ११ ग्रामपंचायतींचे सरपंच, मनपातील अधिकाऱ्यांना देखील मनपाने नोटिसा पाठविल्या आहेत़ उपमहापौर हे महापालिकेत सेवक होते, त्यांची भरती देखील मजरेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाली आहे़ मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या वेळी मनपा सेवेला रामराम ठोकला आहे़ ५ मे १९९२ साली झालेल्या हद्दवाढीत ११ गावे समाविष्ट करण्यात आली़ रातोरात कर्मचारी भरती करुन ग्रामपंचायतींनी आपल्याकडे जास्त कर्मचारी असल्याचे बोगस रेकॉर्ड तसेच सेवापुस्तके तयार करून मनपाची फसवणूक केली़ २२ वर्षांनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे़ मजरेवाडी ग्रामपंचायतीने २१० तर उर्वरित १० ग्रामपंचायतींनी आपले ९० कर्मचारी मनपामध्ये घुसविले आहेत़हा संगनमताने केलेला घोटाळा असून यात मनपाची फसवणूक झाली आहे़ कायदेशीर अभिप्राय घेऊन पहिल्या टप्प्यात सर्वांना नोटिसा पाठवून नंतर फौजदारी केली जाणार आहे, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़ त्यामुळे ३०० कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे़