विना परवाना आंदोलन ; सोलापूरच्या महापौरांसह भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 15:55 IST2018-10-13T15:53:26+5:302018-10-13T15:55:48+5:30

सोलापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची प्रतिमा लावुन हुतात्मा चौकातील चार ...

Non-licensed agitation; A complaint was lodged against BJP-Congress workers including Solapur Mayor | विना परवाना आंदोलन ; सोलापूरच्या महापौरांसह भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विना परवाना आंदोलन ; सोलापूरच्या महापौरांसह भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- विना परवाना आंदोलन केल्याची तक्रार- काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल- पोलीसाचा पुढील तपास सुरू

सोलापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची प्रतिमा लावुन हुतात्मा चौकातील चार पुतळा येथे अवमान करून निदर्शने केल्याप्रकरणी सोलापूर शहराच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह आठ ते दहा जणांविरूद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगरसेविका संगिता जाधव, संदीप जाधव, जगदीश यनगुंडी, अमोल गायकवाड यांच्यासह ८ ते १0 जणांचा गुन्ह्यात समावेश आहे. अहमदनगर येथे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावुन अशाच प्रकारचे आंदोलन केले होते़ तसेच आंदोलन सोलापुरातील शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता हुतात्मा चौकात केले होते़ या आंदोलनात राहुल गांधी यांची प्रतिमा विनापरवाना लावल्याचा काँग्रेसने आरोप केला़ याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून महापौरांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

Web Title: Non-licensed agitation; A complaint was lodged against BJP-Congress workers including Solapur Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.